07 March 11:56

आता शेतकऱ्यांना हवामानाचे अलर्ट मोबाइलवर मिळणार- आयएमडी


आता शेतकऱ्यांना हवामानाचे अलर्ट मोबाइलवर मिळणार- आयएमडी

कृषिकिंग, पुणे: विजांचा कडकडाट, वादळी पाऊस, अतिवृष्टीचा इशारा आता थेट नागरिकांच्या मोबाइलवर येणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी हवामानशास्त्र विभागाने आता लोकांशी विशेषतः शेतकऱ्यांशी थेट 'कनेक्ट' होण्याचे ठरवलंय. त्यासाठी येत्या पावसाळ्यापासून शेतकऱ्यांना मोबाइलवर अलर्ट देण्यात येणार आहेत.

पुणे हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक के.जे.रमेश यांनी विभागातील अधिकाऱ्यांबरोबर मान्सून अंदाजासंदर्भात बैठक घेतली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे.

काही राज्यांत प्रायोगिक तत्त्वावर मेसेज पाठविण्यास सुरुवात झाली आहे. एवढेच नव्हे, तर टीव्ही आणि एफएम रेडिओवरही दर काही तासांनी अपडेट मिळणार आहेत. अशी माहितीही के.जे.रमेश यांनी यावेळी दिली आहे.