08 May 12:35

आजही सहा राज्यांना हाय अलर्ट; राजस्थान-हरियाणात धुळीचे वादळ


आजही सहा राज्यांना हाय अलर्ट; राजस्थान-हरियाणात धुळीचे वादळ

कृषिकिंग, नवी दिल्ली: १३ राज्यांमध्ये आजही (मंगळवारी) वादळाचा अलर्ट देण्यात आला आहे. तर दिल्ली, हिमाचलसह सहा राज्यांमध्ये वादळासह पावसाची आणि ईशान्येकडील सहा राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस होण्याचा अंदाज आहे. यामध्ये आसाम, मेघालय, नागालंड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा या सहा समावेश आहे. त्यामुळे या राज्यांना आज हाय अलर्ट देण्यात आला आहे.

तर जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली आणि पश्चिमी उत्तर प्रदेशच्या विविध भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह वादळ येण्याची आणि जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम राजस्थानमध्ये धुळीच्या वादळाची शक्यता आहे. राजस्थानमध्ये वाळुचे वादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दिल्लीमध्ये दुसऱ्या शिफ्टमधील शाळांना सुटी देण्यात आली आहे. हिमाचलच्या लाहौल स्पितीमध्ये आज (मंगळवारी) सकाळी बर्फवृष्टी झाल्याने हवामान आनंददायी झाले होते. त्यापूर्वी सोमवारी सोमवारी ५ च्या सुमारास पाकिस्तानातून राजस्थानच्या बिकानेरमध्ये आलेले धुळीचे वादळ रात्री उशिरा दिल्ली-एनसीआर, आणि हरियाणामध्ये पोहचले. त्यामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये रस्त्यांवरील दृश्यमानता पूर्णपणे घटली होती.