19 April 17:58

आगामी काळात परिणामकारक हवामान अंदाजावर भर- एम.राजीवन


आगामी काळात परिणामकारक हवामान अंदाजावर भर- एम.राजीवन

कृषिकिंग, पुणे: “हवामान विभागाकडून हवामानाचा अंदाज दिला जातो़ पण, या अंदाजाचा नेमका काय परिणाम होणार आहे, त्याचा उल्लेख नसतो़. यापुढील काळात हवामानाच्या अंदाजावर नेमका काय परिणाम होऊ शकेल, याचा समावेश त्यात असणार आहे,” असे अर्थ-सायन्स मंत्रालयाचे सचिव डॉ़. माधवन नायर राजीवन यांनी सांगितले़ आहे. इंडियन मेट्रॉलॉजीकल विभागात आजपासून सुरु झालेल्या साऊथ एशियन क्लायमेट आऊटलुक फोरमची दोन दिवसांच्या परिषदेचे उद्घाटन डॉ़. राजीवन यांच्या हस्ते झाले़. यावेळी ते बोलत होते़.

या परिषदेत भारतासह बांग्लादेश, म्यानमार, श्रीलंका या देशाचे हवामान शास्त्रज्ञ सहभागी झाले आहेत़. डॉ़ राजीवन पुढे म्हणाले आहे की, हवामान विभागाकडून मान्सूनचा अंदाज जाहीर केला जातो़. त्याच्या अगोदर काही खासगी संस्थांकडून अंदाज जाहीर केला जात असला तरी त्यांना थांबविण्याचे कोणतेही धोरण नाही़. हवामान विभागाला आवश्यक ती अत्याधुनिक सामुग्री दिली जात असून या विभागाच्या हवामान अंदाजात सुधारणा होत आहे़.”

हवामान विभाग आणि कृषी हवामान केंद्राच्या सहाय्याने देशभरातील शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या मार्फत २ कोटी लोकांना कृषी हवामानाविषयी एसएमएस पाठविण्यात येतात़. आता हवामान विभाग प्रत्येक जिल्ह्यात कृषी हवामान केंद्र सुरु करणार असून, प्रत्येक ठिकाणी दोन शास्त्रज्ञ आणि एक सहायक नेमणार आहे़. त्यांना सर्व सामुग्री देण्यात येईल़. त्यातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे कृषी पोर्टल तयार करण्यात येणार आहे़. देशभरातील सर्व राज्य शासनांकडून शेतकऱ्यांचे मोबाईल मागविण्यात येत आहेत़. त्यानंतर हवामान विभाग स्वत:ची एसएमएस सेवा सुरु करणार आहे़. देशातील निम्म्या शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या प्रादेशिक भाषेत पोचविली जाणार असून त्यांची सुरुवात येत्या जूनपासून करण्यात येणार आहे़. असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.