11 December 12:45

अर्ज न करू शकलेल्या पात्र शेतकऱ्यांनाही कर्जमाफीची संधी देणार-मुख्यमंत्री


अर्ज न करू शकलेल्या पात्र शेतकऱ्यांनाही कर्जमाफीची संधी देणार-मुख्यमंत्री

कृषिकिंग, नागपूर: जे शेतकरी कर्जमाफीला पात्र होते मात्र त्यांना अर्ज करता आला नाही. अशा शेतकऱ्यांनाही कर्जमाफी संधी देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या घोषणेमुळे समस्यांच्या चक्रात अडकलेल्या बळीराजाला काहीसा दिलासा मिळाला आहे.

"कर्जमाफीसाठी सरकारकडे एकूण ७७ लाख खात्यांचे अर्ज प्राप्त आले. डुप्लिकेशन नंतर यापैकी ६९ लाख खाती प्रोसेसिंगसाठी घेतली. त्यातून ४१ लाख खात्यांचे निर्णय झाले आहेत. निधीही मंजूर करण्यात आला आहे." असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला प्रथेप्रमाणे विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालत सरकार शेतकऱ्यांबाबत गंभीर नसल्याची टीका केली. त्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन कर्जमाफीला पात्र असूनही अर्ज न केलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीची संधी देणार आहे. बोंड अळीबाबत केंद्राकडून मदत मागणार असल्यचे स्पष्ट केले. तसेच विरोधकांची टेप फक्त सैराटवर अडकली आहे, हल्ला बोल करणाऱ्यांचे डल्ला मार प्रकरण अधिवेशनात समोर आणणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. इतकेच नाही तर ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली त्यांची नावे तालुकानिहाय जाहीर करण्यात येतील. राज्यात कर्जमाफी पारदर्शक पद्धतीनेच झाली. शेवटच्या पात्र शेतकऱ्यापर्यंत कर्जमाफी होईपर्यंत ही प्रक्रिया सुरु ठेवण्यात येईल. असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.