01 March 12:41

अन्नसुरक्षा, उत्पादकतावाढीसाठी जीएम संशोधन थांबू नये- पवार


अन्नसुरक्षा, उत्पादकतावाढीसाठी जीएम संशोधन थांबू नये- पवार

कृषिकिंग, मुंबई: जीएम तंत्रज्ञानाला संघप्रणीत संस्था विरोध करत असताना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पुन्हा एकदा जीएम पिकांचे समर्थन केले आहे. अन्नसुरक्षा आणि उत्पादकतावाढीसाठी जैवतंत्रज्ञानाचे निरंतर संशोधन आवश्‍यक असल्याचे सांगत त्यांनी पुरेशा तपासण्या आणि पर्यावरण सुरक्षेची दक्षता घ्यावी, असे सुचवले आहे. बीटी कापसाची घटलेली प्रतिकारक्षमता आणि बीटीच्या (एचटी) एसआयटी चौकशीमुळे जीएम संशोधन थांबले आहे.

जनुकीय सुधारित (जीएम) पिके देशाच्या अन्न सुरक्षा समस्या सोडवू शकतात. तथापि, या प्रकरणात पर्यावरण सुरक्षा आणि मानवी आरोग्याच्या बाबींवर परिणाम होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्‍यक आहे. जीएम तंत्रज्ञानाला संघप्रणीत संस्था विरोध करत असून बीटी वांगी, मोहरी आणि तांदळाच्या चाचण्या प्रलंबित आहेत. असेही पवार यांनी यावेळी सांगितले आहे.

देशात अन्नसुरक्षेच्या समस्येसाठी जीन सुसंस्कृत पिके वापरणे आवश्‍यक आहे, असे सांगत पवार म्हणाले, की खरे तर देशात अन्नसुरक्षेच्या समस्येचा पर्याय हवा आहे. आपली उत्पादनक्षमता वाढवावी लागेल. उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी आधुनिक विज्ञान आणि जैवतंत्रज्ञानसहित अन्य तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला पाहिजे.