24 February 09:00

म्हशींच्या तोंडखुरी किंवा लाळ खुरकूत रोगाची लक्षणे व ईलाज


 म्हशींच्या तोंडखुरी किंवा लाळ खुरकूत रोगाची लक्षणे व ईलाज

हा एक अतिशय संसर्गजन्य विषाणूजन्य रोग असून, मरतुकीपेक्षा आर्थिक नुकसान जास्त होते. अाजारी जनावरामार्फत दूषित हवा, चारा, पाणी इ.मार्फत प्रसार होतो.
लक्षणे -
- म्हशीच्या तोंडात (जिभेवर, हिरड्यावर) व खुरांमध्ये फोड येतात व जखमा होतात.
- जास्त ताप येऊन म्हशी सतत लाळ गाळतात.
- जखमांमुळे खाणे-पिणे कमी होते किंवा बंद होते. परिणामी दूध उत्पादन कमी होते.
- गाभण म्हशीमध्ये गर्भपात होऊ शकतो.
उपचार व प्रतिबंध -
- जखमा १ टक्का पोटॅशियम परमॅग्नेट किंवा २ टक्के सोडिअम बायकार्बोनेटच्या द्रावणाने स्वच्छ कराव्यात.
- जखमांवर बोरोग्लिसरीन व हळद लावावी.
- पायांना २ टक्के कॉपर सल्फेट द्रावणाने धुवावे.
- म्हशींना वेदनाशामक औषधी, प्रतिजैविके, टॉनिक व ग्लुकोज पशुवैद्याकडून द्यावे.
- रोगी म्हशींना वेगळे करून चारा, पाणी द्यावे.
- मार्च किंवा एप्रिल, तसेच सप्टेंबर किंवा ऑक्टोवबर महिन्यामध्ये सहा महिन्यांच्या अंतराने लस द्यावी.

-डॉ. एम. व्ही. इंगवले स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला.

कृषिकिंग द्वैमासिक नोंदणीसाठी टोल फ्री क्रमांक 18002708070
http://www.krushiking.com/advdetails.php?table=tbloffers_new&id=82