स्मार्ट भारतीय गाय आणि गोशाळा व्यवस्थापन स्मार्ट भारतीय गाय आणि गोशाळा व्यवस्थापन

नवीन उत्पादने

a
स्मार्ट भारतीय गाय आणि गोशाळा व्यवस्थापन

मागवा

स्मार्ट भारतीय गाय आणि गोशाळा व्यवस्थापन


ऑफर

आमच्या महाराष्ट्रातील वाटेगाव, पुणे व दिल्ली या काही निवडक केंद्रांवर दुग्धव्यवसायासाठीचे प्रशिक्षण वर्ग सुरु आहेत. आठवडयाच्या शेवटी अत्यंत कमी कालावधीत व्यावहारिक अनुभव या प्रशिक्षणाच्या माध्यमातून दिले जाते.


महत्वाचे गुणधर्म / तपशील

दुग्धव्यवसाय हा कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेचा एकत्रित मिश्रित घटक आहे. कारण यामध्ये प्राणी, मजूर, पर्यवेक्षक, पुरवठादार आणि खरेदीदार इत्यादी बाबींच्या हाताळणीमुळे ही कला समजली जाते. प्राणी आरोग्य, उत्पादन, पुनरुत्पादनाचा यात समावेश असल्याने त्यात विज्ञान येते. तर आपल्याला या व्यवसायामध्ये पैशांची गुंतवणूक करावी लागते व त्यातून नफा मिळवता येतो. म्हणून त्यात वाणिज्य शाखाही अंतर्भूत असते.
आमच्या महाराष्ट्रातील वाटेगाव, पुणे व दिल्ली या काही निवडक केंद्रांवर दुग्धव्यवसायासाठीचे प्रशिक्षण वर्ग सुरु आहेत. आठवडयाच्या शेवटी अत्यंत कमी कालावधीत व्यावहारिक अनुभव या प्रशिक्षणाच्या माध्यमातून दिले जाते.
दुग्धव्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम:
१. पहिला टप्पा: कालावधी २ ते ३ महिने
- गाईचे शेण आणि मुत्राआधारित प्रशिक्षण घेण्यासाठी ३ दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
-या प्रशिक्षण कार्यक्रमात आमच्या bhartiyacow.com या वेबसाईटच्या माध्यमातून व्हिडीओ आधारित प्रशिक्षण दिले जाते.
- या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत जर तुम्हांला प्रत्यक्ष गोशाळा/दुग्धशाळेत जाऊन व्यावहारिक प्रशिक्षण घ्यायचे असल्यास १००० रुपये/प्रतिदिन शुल्क निर्धारित करण्यात आले आहे.
-प्रवास, जेवण, आणि राहण्याच्या व्यवस्थेचा यात समावेश नाही.

२. दुसरा टप्पा: कालावधी १५ महिने
- दुसऱ्या टप्प्यात आपला दुग्धशाळा उभारणीसाठीचा प्रकल्प अहवाल निश्चित करा.
-आपले निष्कर्ष, मार्केटिंग, SWOT अनॅलिसिस ठरवा.
-मार्गदर्शक सूचनांच्या आधारे कमीत-कमी १ वर्षात तुमचे काम सुरु करा.
-संपूर्ण कर्ज NIL होईपर्यंत फॉलो अप घेत राहा.
३. तिसरा टप्पा: कालावधी ५ ते २० वर्ष
-आणि आपल्या अंतिम तिसऱ्या टप्प्यात वासरे, गायी, बैल, दूध, दुधाचे पदार्थ, गाय शेण आणि मुत्राधारित प्रॉडक्ट्सचे चांगले पुरवठादार व्हा.
-उत्पादने, प्रशिक्षण केंद्र आणि गाय पर्यटन केंद्र.
याशिवाय तुम्हांला असलेल्या शंकासाठी आमचा विशेष तज्ज्ञांचा समूह नेहमी उपलब्ध असणारच आहे. यामध्ये
१. माती, पाणी, रक्त, मूत्र, मल यांचे परीक्षण.
२. पंचगव्य प्रशिक्षण व व्यापार
३. बायोगॅस, एलपीजी आणि सीएनजी
४. डेटाबेस व्यवस्थापन
५. ग्राहक संबंध व्यवस्थापन
६. याशिवाय एकाच छताखाली ३२ टॉपिक्स संदर्भात माहिती.


संपर्क

मोबाईल नं : 9822194289

ई-मेल : smartbhartiyacow@gmail.com

वेबसाईट : http://bhartiyacow.com/

पत्ता : वाटेगाव, पुणे व दिल्ली