सूक्ष्म, लघु और मध्यम उद्यम मंत्रालय, भारत सरकार सूक्ष्म, लघु और मध्यम उद्यम मंत्रालय, भारत सरकार

नवीन उत्पादने

a
सूक्ष्म, लघु और मध्यम उद्यम मंत्रालय, भारत सरकार

मागवा

सूक्ष्म, लघु और मध्यम उद्यम मंत्रालय, भारत सरकार


ऑफर

केंद्रीय मधुमक्षिकापालन संशोधन व प्रशिक्षण संस्था, खादीग्रामोदयोग आयोग, सूक्ष्म, वलघु, आणि मध्यम उद्यम मंत्रालय, भारत सरकार, पुणे-१६. ही अखिल भारतीय स्तरावर एकमेव अशी मधुमक्षिकापालन यावर संशोधन आणि प्रशिक्षण देणारी संस्था आहे. ह्या संस्थेमार्फत मधुमक्षिकापालनाचे निरनिराळे प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात. वर्ष २०१८-१९ करीत इच्छुक उमेदवारांकडून खालील प्रशिक्षणाकरिता अर्ज मागवण्यात येत आहेत.


महत्वाचे गुणधर्म / तपशील

(अ) क्षमता व निर्माण कार्यक्रम

१. मधमाशापालन प्रमाणपत्र प्रशिक्षण कार्यक्रम एक महिन्याचा असून, १५ ते ४५ वर्ष वयोगटातील किमान एस.एस.सी/ १० वी पास व्यक्ती यासाठी कर्ज शकते. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी रु. ८००/- विद्यावेतन देण्यात येणार आहे.

२. अल्पावधी मधमाशापालन प्रशिक्षण कार्यक्रम पाच दिवसांचा असून, १६ वर्ष व त्यापेक्षा अधिक वयाची कोणीही व्यक्ती यासाठी अर्ज करू शकते. यासाठी रु. ५०० /-व्यक्तिगत प्रशिक्षण शुल्क निर्धारित करण्यात आले आहे.

३. आग्या माधमाशी प्रशिक्षण कार्यक्रम पाच दिवसांचा असून, १६ वर्ष व त्यापेक्षा अधिक वयाची कोणीही व्यक्ती यासाठी अर्ज करू शकते. यासाठी रु. ५०० /- व्यक्तिगत प्रशिक्षण शुल्क निर्धारित करण्यात आले आहे.

४. मधपरीक्षण प्रमाणपत्र प्रशिक्षण कार्यक्रम एक महिन्याचा असून, १६ वर्ष व त्यापेक्षा अधिक वयाची कोणीही व्यक्ती यासाठी अर्ज करू शकते. यासाठी रु. १००० /-व्यक्तिगत प्रशिक्षण शुल्क निर्धारित करण्यात आले आहे.

५. मधमाशापालन जनजागृती/EAP प्रशिक्षण कार्यक्रम एक महिन्याचा असून, १६ वर्ष व त्यापेक्षा अधिक वयाची कोणीही व्यक्ती यासाठी अर्ज करू शकते. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी रु.२०/-प्रत्येकी (शाळा/कॉलेज विद्यार्थ्यांसाठी) प्रशिक्षण शुल्क निर्धारित करण्यात आले आहे.


(ब) एस्पायर कार्यक्रम

६. मधमाशापालन व्यापक प्रशिक्षण कार्यक्रम तीन महिन्यांचा असून, त्यासाठी १६ ते ४५ वर्ष वयोगटातील बी.एस.स्सी (जीवशास्र/ कृषी /वनीकरण) पदवीधारक अर्ज करू शकतात. त्यासाठी रु. ६०००/- प्रशिक्षण शुल्क निर्धारित करण्यात आले आहे.

७. राजान्य, पराग, प्रपोलीस, मेन, संकलन व संरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम दोन आठवड्यांचा असून, त्यासाठी १६ ते ४५ वर्ष वयोगटातील एस.एस.सी/ १० वी पास पात्रताधारक अर्ज करू शकतात. त्यासाठी रु. ३०००/- प्रशिक्षण शुल्क निर्धारित करण्यात आले आहे.

८. मधू प्रशोधन प्रशिक्षण, मध आणि संबंधित उत्पादनांचे पॅकिंग आणि विपणन प्रशिक्षणाकरिता मधमाशापालन, मध प्रशोधन प्रशिक्षण कार्यक्रम तीन आठवड्यांचा असणार असून, त्यासाठी १६ ते ४५ वर्ष वयोगटातील कोणीही व्यक्ती अर्ज करू शकतात. शैक्षणिक अट नाही. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी रु. ३००० प्रशिक्षण शुल्क निर्धारित करण्यात आले आहे.

९. मधमाशीपालन कृत्रिम राणी निर्माण व वसाहत वाढविणे प्रशिक्षण कार्यक्रम तीन आठवड्यांचा असून, १६ ते ४५ वर्ष वयोगटातील कोणीही व्यक्ती अर्ज करू शकतात. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रशिक्षणार्थीला मधमाशीपालन माहिती आवश्यक आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी रु. ३००० प्रशिक्षण शुल्क निर्धारित करण्यात आले आहे.

१०. मधपाळा करिता मधमाशीपालन हॉबी प्रशिक्षण कार्यक्रम पाच दिवसांचा असून, १६ ते ५० वर्ष वयोगटातील कोणीही व्यक्ती त्यासाठी अर्ज करू शकते. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी रु. १००० प्रशिक्षण शुल्क निर्धारित करण्यात आले आहे.


१. वरील मधमाशापालन प्रमाणपत्र प्रशिक्षणाकरीता रुपये ८००/- विद्यावेतन देण्यात येईल.
२. वरील प्रशिक्षणादरम्यान, प्रशिक्षणार्थीची राहण्याची व्यवस्था सशुल्क करण्यात येईल. जेवणाची व्यवस्था स्वतः करावी लागेल.
३.प्रशिक्षणाच्या सुरुवातीला मधमाशा प्रमाणपत्र प्रशिक्षणाकरिता रु. १०००/- अनामत जमा करावी लागेल.
४.वरील क्र.१ प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०१८ आहे. तसेच वरील प्रशिक्षणाकरिता छापील अर्ज व इतर माहितीकरिता संस्थेच्या वरील पत्त्यावर संपर्क साधावा.
अधिक माहितीकरिता दूरध्वनी क्रमांक ०२०-२५६७५८६५,२५६५५३५१. मो.क्र. ९६२३५५३०५६, ७३८५२८९७०९, ९०७५४०८१२७.
(E mail- cbrti.kvic.@gmail.com) (E mail- cbrtipune.kvic.@gov.in)


संपर्क

मोबाईल नं : 7385289709

ई-मेल : cbrtipune.kvic@gov.in

वेबसाईट : http://www.kvic.org.in

पत्ता : ११५३, गणेशखिंड रोड, पुणे- ४११ ०१६