शिवार समाज आणि राजकारण - अस्वस्थ वर्तमानाच्या नोंदी शिवार समाज आणि राजकारण - अस्वस्थ वर्तमानाच्या नोंदी

नवीन उत्पादने

a
शिवार समाज आणि राजकारण - अस्वस्थ वर्तमानाच्या नोंदी

मागवा

शिवार समाज आणि राजकारण - अस्वस्थ वर्तमानाच्या नोंदी


ऑफर

शेतीतील राजकारण आणि शेतकऱ्यांची निराशा....


महत्वाचे गुणधर्म / तपशील

'शिवार, समाज आणि राजकारण'

लेखक, पत्रकार रमेश जाधव लिखित 'शिवार, समाज आणि राजकारण' या पुस्तकाचे अलीकडेच पुण्यात प्रकाशन झाले. पुस्तकाचं नाव व मुखपृष्ठ एकूणच पुस्तक हे कृषी व्यवस्था, गाव, शिवार यांविषयी असल्याचे सांगून जाते.

गेल्या दोन-अडीच दशकांपासून शेतकऱ्यांच्या समस्या अधिकच रौद्ररूप धारण करताहेत. त्यातून कृषी व्यवस्था आणिक एकूणच समाजव्यवस्थेत निर्माण झालेली अराजकता. शेतकरी आणि इतर शहरी समाज यांच्यात निर्माण झालेली दरी. या बाबींसंदर्भातील लेखांचा संग्रह लेखक, पत्रकार रमेश जाधव यांनी यांनी पुस्तक रूपात वाचकांसाठी उपलब्ध करून दिला आहे.

या पुस्तकात लेखकाने शेती व्यवस्थेबद्दल मध्यमवर्गीय शहरी समाजात असलेली विपरीत धारणा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय शेतकरी नेते शेतकऱ्यांचा कळवळा दाखवत राजकारण कसं पुढे रेटतात. त्याचवेळी शेतकरी कुठल्या अवस्थेतून जात आहे. यासह अन्य महत्वाच्या गोष्टींचा उहापोह या लेखांच्या माध्यमातून करण्यात आला आहे. यासाठी त्यांनी नेमक्या आकडेवारीचे दाखले देत शेतकऱ्यांच्या वाताहतीचं वर्णन केलं आहे.

याशिवाय विविध समस्यांमध्ये अडकलेला समाज. या समाजाची शेतीच्या समस्यांविषयीची असलेली अनास्था. व समाजाच्या समस्यांचा शेतीच्या दुरावस्थेशी नेमका संबंध काय? हे दाखवून देण्याचा प्रयत्न या लेखसंग्रही पुस्तकातून लेखकाने केला आहे.

मक्तरंग प्रकाशनचे 'शिवार, समाज आणि राजकारण' हे २२४ पानी पुस्तक असून, त्याची किंमत ३०० रुपये इतकी आहे.

'शिवार, समाज आणि राजकारण' हे पुस्तक आमच्याकडे उपलब्ध आहे. हे पुस्तक वाचण्याची, समजून घेण्याची आपल्या इच्छा असल्यास तसेच आपल्याला किंवा आपल्या मित्राला हे पुस्तक हवे असल्यास कृपया आम्हाला त्वरीत संपर्क करा. त्यासाठी आपले पूर्ण नाव, पत्ता(पिनकोड सहित) आणि ईमेल आयडी 8551993311 या व्हाट्स अप नंबर वर पाठवा. किंवा फोन करा.

ऑनलाईन पेमेंट लिंक खाली दिली आहेसंपर्क

मोबाईल नं : 8551993311

ई-मेल :

वेबसाईट : https://bit.ly/2PkaU2N

पत्ता : पहिला मजला, शिवरात्न कॉम्प्लेक्स, डी.ए.व्ही. स्कूल समोर, आंबेडकर चौक, औंध , पुणे ४११००७