ए. के.मोबाईल ऑटोस्विच ए. के.मोबाईल ऑटोस्विच

नवीन उत्पादने

a
ए. के.मोबाईल ऑटोस्विच

मागवा

ए. के.मोबाईल ऑटोस्विच


ऑफर

"ए. के.मोबाईल ऑटोस्विच घरपोच फक्त ३२००/- रुपयांत!"


महत्वाचे गुणधर्म / तपशील

"ए. के.मोबाईल ऑटोस्वीच ची वैशिष्ट्ये:"

तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून फोन करून अथवा मेसेज करून जगाच्या कोणत्याही ठिकाणाहून मोटरपंप चालू अथवा बंद करता येतो तसेच आता मोटरपंप चालू आहे की बंद आहे याची स्थिती जाणून घेता येते.

विहिरीतील किंवा बोरमधील पाणी संपल्यानंतर (ड्रायरन झाल्यानंतर) मोटरपंप आपोआप बंद केला जातो आणि तुम्हाला फोन/मेसेज करून मोटरपंप बंद केल्याचे कळवले जाते

ड्रायरन मोड:
(१)ड्रायरन झाल्यानंतर एका विशिष्ट वेळानंतर मोटरपंप आपोआप चालू होईल याचे सेटिंग करता येते.
(२)ड्रायरन झाल्यानंतर फ्युज/सप्लाय जाऊन आल्यानंतर मोटरपंप आपोआप चालू होईल याचे सेटिंग करता येते.
(३)एकदा ड्रायरन झाल्यानंतर जोपर्यंत मोबाईलवरून मोटरपंप चालू केला जात नाही तोपर्यंत मोटरपंप
बंद राहील याचे सेटिंग करता येते.

टाइमर मोड:
(१)मोटरपंप एका विशिष्ट वेळेकरता चालू ठेवता येतो
उदा. १मिनिट,२मि........२४तास.
(२)मोटरपंप घड्याळाच्या वेळेनुसार एका विशिष्ट वेळेकरता चालू ठेवता येतो.
उदा. रात्री ११:०० ते पहाटे ०३:००
(३)सायक्लीक टाइमर १ मिनीटापासून २४ तासांपर्यंत सेट करता येतो.
उदा. मोटरपंप १० मिनिटे चालू आणि १ तास बंद आणि पुन्हा १० मिनिटे चालू आणि १ तास बंद असा चालवता येतो.

कनेक्शन फॉल्ट:
कनेक्शन मध्ये कोणताही बिघाड असेल जसे की मोटरला जाणारी वायर तुटलेली असणे, स्टार्टरमधील रिले ओव्हरलोड झालेला असणे किंवा मोबाइल ऑटोच्या वायर चुकीच्या ठिकाणी जोडलेल्या असणे इ., तर मोटरपंप चालू करतेवेळीच तसे वापरकर्त्याला कळवले जाते.

अलर्ट:
"ए. के. मोबाईल ऑटोस्विच" चक्क तुमच्याशी आवाजात बोलतो.
मोबाइल न वापरता स्टार्टरवरून जर मोटरपंप कोणी चालू/बंद केला तर युझरला तसे अलर्ट केले जाते.
सप्लाय व्यवस्थित आल्यानंतर मोटरपंप आपोआप सुरू करायचा की वापरकर्त्याला कॉल/मेसेज करून मोटरपंप सुरू करण्यासंबंधी विचारायचे, याचे सेटिंग तुम्हाला अगोदरच करून ठेवता येते.
फ्यूज गेल्यानंतर, सप्लाय सुरळीत आल्यानंतर, मोटरपंप चालू/बंद झाल्यानंतर तुम्हाला फोनद्वारे कॉल/मेसेज करून तसे कळवले जाते.
रजिस्टर केलेल्या ९ मोबाईल नंबरपैकी ज्या नंबरवरून सर्वात शेवटी कॉल/मेसेज आला होता त्या नंबरच्या मोबाईलवर अलर्ट पाठविले जातात.
"ए. के. मोबाईल ऑटोस्विच" कडून येणारा अलर्ट कॉल असावा की मेसेज हे तुम्हाला ठरवता येते.
"ए. के. मोबाईल ऑटोस्विच" कडून येणारे सर्व अलर्ट तुम्हाला चालू अथवा बंद करता येतात.

ट्रू-कॉलर:
मोटरपंप, रजिस्टर केलेल्या नंबरवरूनच चालू/बंद व्हावा की कोणत्याही नंबरवरून चालू/बंद व्हावा हे तुम्हाला ठरवता येते.

बॅलन्स:
मोबाईल ऑटोस्विचच्या सिमकार्ड मध्ये किती बॅलन्स आहे हे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मेसेजद्वारे कळवले जाते.
ऑटोस्विचच्या सिमकार्ड मध्ये एकही रुपये बॅलन्स नसेल तरी सिस्टिम चालते.

सेक्युरिटी:
जर तुमचा "ए. के. मोबाईल ऑटोस्विच" चोरी झाला असेल तर काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही, यामध्ये आहे "ट्रॅकर" आणि "डिव्हाइस लोकेशन" सुविधा. ज्यामुळे तुम्हाला समजेल आता तुमचा "ए. के. मोबाईल ऑटोस्विच" पृथ्वीवर कुठे आहे आणि त्यामध्ये कोणत्या नंबरचे सिमकार्ड टाकले गेले आहे. याच माहितीचा उपयोग करून तुम्हाला तुमचा ऑटोस्विच शोधून काढता येईल.
सिस्टिम चोरी झाल्यानंतर जर तुम्ही "ए. के.मॅजिक ऑफ सायन्स" कंपनीला कळवले तर चोरी झालेली सिस्टिम बंद करून ठेवता येते. बंद केलेली सिस्टिम वापरण्यायोग्य राहत नाही.

गॅरंटी
१ वर्षामध्ये कोणताही बिघाड झाल्यास पीस बदलून मिळतो

मूळ किंमत:३२००/-
GST:५७६/-

निव्वळ रक्कम:३२००+५७६=३७७६/-
इन्स्टॉल करून घ्यायचे असल्यास ५००रु. वेगळा चार्ज आकारला जाईल
ऑफर कालावधी ३० डिसेंबर २०१८पर्यंत
प्रोडक्टच्या दर्जामध्ये कोणताही फरक नाही
नवीन ऑफर जाणून घेण्यासाठी
दिलेल्या क्रमांकावर फोन करा किंवा गुगल वर सर्च करा "ak magic of science"

संपर्क
८४१२०८२२८४


संपर्क

मोबाईल नं : 9881692930

ई-मेल : ratulmk@gmail.com

वेबसाईट :

पत्ता : मु.:अंजनगाव, पो.:कऱ्हावागज, ता.:बारामती, जि.:पुणे ४१३ १०२