चारा छावण्यांतील जनावरांच्या अनुदानात वाढ- महसूलमंत्री
16 May 13:45

चारा छावण्यांतील जनावरांच्या अनुदानात वाढ- महसूलमंत्री


चारा छावण्यांतील जनावरांच्या अनुदानात वाढ- महसूलमंत्री

कृषिकिंग, मुंबई: चारा छावण्यांतील जनावरांच्या अनुदानात वाढ करण्यात आलीये. आता प्रति जनावरांसाठी ९० रुपयांऐवजी १०० रुपये अनुदान मिळणार आहे. अशी माहिती महसूलमंत्री तथा दुष्काळ निवारण उपाय योजना उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

चारा छावण्यांतील जनावरांसाठी लागणाऱ्या वैरणीची खरेदी व त्यावरील वाहतुकीचा खर्च तसेच मोठ्या जनावरांसाठी प्रतिदिवस १८ किलो हिरवा चारा व आठवड्यातून तीन दिवस १ किलो पशुखाद्य आणि लहान जनावरांसाठी ९ किलो हिरवा चारा व लहान जनावरांसाठी १ किलो पशुखाद्य देण्यात येत असल्यामुळे चारा छावण्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये प्रति जनावरासाठी १० रुपयांची वाढ करून आता मोठ्या जनावरांसाठी १०० रुपये तर लहान जनावरांसाठी ५० रुपये दर देण्यात येणार आहे, अशी माहितीही पाटील यांनी यावेळी दिली आहे.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात दुष्काळ निवारणासंबंधीच्या उपसमितीची बैठक झाली. या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच राज्यातील दुष्काळी परिस्थिती, चारा छावणी, पाणी पुरवठा, रोहयो आदींचा या बैठकीत एकत्रित आढावाही घेण्यात आला. असेही ते म्हणाले आहे.संबंधित बातम्या