शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; दुष्काळाबाबतच्या उपाययोजनांवर चर्चा
16 May 10:21

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; दुष्काळाबाबतच्या उपाययोजनांवर चर्चा


शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; दुष्काळाबाबतच्या उपाययोजनांवर चर्चा

कृषिकिंग, मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी काल (बुधवारी) संध्याकाळी भेट घेतली. या बैठकीत दुष्काळाबाबतच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, प्रफुल्ल पटेल, राणा जगजीतसिंह पाटील, दीपक साळुंखे हेही उपस्थित होते.

या बैठकीत शरद पवार यांनी आपल्या दुष्काळ दौऱ्यानंतर लोकांकडून आलेल्या मगाण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. यामध्ये फळबाग, चारा छावण्या, दुष्काळी भागातील नागरिकांच्या हाताला काम, योग्य पाणी नियोजन, दुष्काळ भागात अन्नधान्य नियोजन, जायकवाडी धरण पाणी या प्रमुख विषयांवर चर्चा करण्यात आली.

याशिवाय दुष्काळग्रस्त भागात जनावरांसाठी चारा छावण्या उशिरा दिल्या गेल्या. चारा अनुदान केवळ ९० रुपये दिले जाते ते ११० रुपये करावे. केवळ ऊस चारा म्हणून न देता इतर चाराही द्यावा. फळबागा जळून चालल्या आहेत. फळबाग जळणे म्हणजे २५ वर्षांचं नुकसान आहे. आमच्या सरकारच्या काळात आम्ही प्रति-हेक्टर ३५ हजार नुकसान भरपाई दिली होती. ते द्यावेत. २०११ च्या जनगणनेनुसार पाणी दिले जाते त्यात बदल करावा. दुष्काळग्रस्त भागात पाणी वाटपात घोटाळा होतो ते रोखावे. छावण्या सुरू झाल्या पण ज्या संस्था छावण्या चालवतात त्यांना पैसे दिले गेले नाही. एका दिवसाचा संस्थांचा खर्च १ लाख रुपये आहे महिनाभर छावण्या कशा चालवणार? विम्याचे पैसे मिळाले नाहीत. फळबाग योजना विमा का मिळाली नाही? जायकवाडी धरणाचे पाणी मराठवाड्याला सध्या देण्यात यावे. नाहीतर बाष्पीभवन होऊन ते पाणी वाया जाईल. या प्रमुख मागण्या शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या आहेत.



टॅग्स

संबंधित बातम्या