मंत्र्यांचे दौरे म्हणजे 'दुष्काळी पर्यटन'; राजू शेट्टींचा सदाभाऊ खोतांवर घणाघात
15 May 12:34

मंत्र्यांचे दौरे म्हणजे 'दुष्काळी पर्यटन'; राजू शेट्टींचा सदाभाऊ खोतांवर घणाघात

मंत्र्यांचे दौरे म्हणजे 'दुष्काळी पर्यटन'; राजू शेट्टींचा सदाभाऊ खोतांवर घणाघात

कृषिकिंग, पुणे: राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे पाण्यावाचून तर जनावरांचे चारा-पाण्यामुळे हाल सुरू आहेत. मात्र, याच दरम्यान होत असलेले मंत्र्यांचे दौरे म्हणजे 'दुष्काळी पर्यटन" असल्याची घणाघाती टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर केली आहे.

सदाभाऊ खोत हे सध्या औरंगाबाद जिल्ह्याच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यासाठी ते औरंगाबादमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी असल्यानं खोत यांच्यावर चोहुबाजूंनी टीका होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टींनी खोत यांच्या दुष्काळी दौऱ्याला 'दुष्काळी पर्यटन' असे म्हटलं आहे.संबंधित बातम्या