जनता दुष्काळात होरपळतीये, अन... मंत्री सदाभाऊ खोत एसीच्या गार वाऱ्यात
15 May 11:00

जनता दुष्काळात होरपळतीये, अन... मंत्री सदाभाऊ खोत एसीच्या गार वाऱ्यात


जनता दुष्काळात होरपळतीये, अन... मंत्री सदाभाऊ खोत एसीच्या गार वाऱ्यात

कृषिकिंग, औरंगाबाद: राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे पाण्यावाचून तर जनावरांचे चारा पाण्यामुळे हाल सुरू आहेत. तर दुसरीकडे राज्याचे पशुसंवर्धन व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे मात्र औरंगाबादमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी असल्याचे समोर आले आहे.

खोत हे सध्या औरंगाबाद जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करीत आहेत. मात्र, आता होरपलेल्या जनतेसोबत दुष्काळाची पाहणी करत असताना सदाभाऊ खोत एसीच्या गार वाऱ्यात, पंचतारांकित हॉटेलात मुक्कामाला असल्याचे समोर आले आहे.

दोनच दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंत्रांच्या दुष्काळ दौऱ्यांवर सडकून टीका केली होती. 'नेते दुष्काळ दौरे करुन काय करतात, महानगरपालिका आणि राज्य सरकारचा फक्त पैसा खर्च करतात. दुष्काळाचा सहल, पर्यटन म्हणून दौरा करण्यात अर्थ नाही. या मंत्र्यांना दौरा आटोपल्यावर काय केलं ते विचारा" अशा शब्दात राज ठाकरेंनी मंत्रांच्या दुष्काळ दौऱ्याला लक्ष्य केलं होतं. असं असतानाच सदाभाऊ खोत हे अशा पद्धतीने सरकारी खजिन्याची उधळपट्टी करताना आढळल्याने आता मंत्र्यांच्या या दुष्काळी दौऱ्याला 'पंचतारांकित दौरा' असंच म्हणण्याची वेळ आहे.टॅग्स

संबंधित बातम्या