नवी मुंबईतून ४२५ टन आंबा निर्यात; जपान-कोरियाचीही निर्यात खुली होणार
15 May 10:35

नवी मुंबईतून ४२५ टन आंबा निर्यात; जपान-कोरियाचीही निर्यात खुली होणार


नवी मुंबईतून ४२५ टन आंबा निर्यात; जपान-कोरियाचीही निर्यात खुली होणार

कृषिकिंग, मुंबई: हापूससह कर्नाटक, केसरसारख्या विविध आंब्यांना परदेशात मोठी मागणी आहे. नवी मुंबईतून, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, रशिया, न्यूझीलंडला आतापर्यंत सुमारे ४२५ टन आंबा निर्यात करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक निर्यात ही हापूसची झाली असून, आवक कमी असून प्रति किलोला सध्या ३० ते ४० रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे.

आतापर्यंत अमेरिकेमध्ये १६५ टन, ऑस्ट्रेलियात १८ टन, रशिया व न्यूझीलंडमध्ये ५० टन, आणि युरोपियन देशांमध्ये २०० टन आंबा निर्यात करण्यात आला आहे. आंब्याचा हंगाम मार्च महिन्यात सुरू होतो. एप्रिल-मे महिन्यात बाजारपेठेत आंब्याची सर्वाधिक आवक होते. मात्र, यावर्षी हापूस आंब्याच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे.

दरम्यान, जपान कोरियाला येत्या काही दिवसांत आंबा निर्यात होण्याची शक्यता आहे. जपानचे निरीक्षक दोन दिवसांत नवी मुंबईत येऊन आंबा निर्यात केंद्राची पाहणी निर्यात केली जाणार आहे.टॅग्स

संबंधित बातम्या