मोदी सरकार आलंही तरी... १३ ते १५ दिवसांत कोसळेल- शरद पवार
15 May 09:28

मोदी सरकार आलंही तरी... १३ ते १५ दिवसांत कोसळेल- शरद पवार


मोदी सरकार आलंही तरी... १३ ते १५ दिवसांत कोसळेल- शरद पवार

कृषिकिंग, मुंबई: पुन्हा मोदींचं सरकार आलं, तर ते फक्त १३ ते १५ दिवस टिकेल, असं भाकीत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रपतींनी मोदींना सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं तरी त्या सरकारची अवस्था १९९६ मधल्या वाजपेयी सरकारसारखीच होईल, असंही पवारांनी यावेळी सांगितलं आहे.

यावेळी पवारांनी दुष्काळावरही मत प्रदर्शन केलं आहे. दुष्काळ दौरा ही विधानसभा निवडणुकीची तयारी नाही. प्रचारासाठी ग्रामीण भागात फिरताना पाहायला मिळालं की, जनतेला दुष्काळाला तोंड द्यावं लागतं आहे. १९७२, १९७८ चा दुष्काळ मी पाहिला आहे. १९७२ मध्ये मी गृह राज्यमंत्री होतो. तर १९७८ मध्ये मी मुख्यमंत्री होतो. तेव्हा पाणी असूनही पीक गेलं होतं. पण आता लोकांना पाणी हवं आहे. धान्य आणि तेलाच्या किमती वाढणार असल्याचेही संकेत पवारांनी दिले आहेत.टॅग्स

संबंधित बातम्या