ठिबक सिंचन तंत्रज्ञान लॅटीन-अमेरिकन देशांसाठी अतिशय महत्त्वाचे
14 May 18:30

ठिबक सिंचन तंत्रज्ञान लॅटीन-अमेरिकन देशांसाठी अतिशय महत्त्वाचे


ठिबक सिंचन तंत्रज्ञान लॅटीन-अमेरिकन देशांसाठी अतिशय महत्त्वाचे

कृषिकिंग, जळगाव: हवामानातील वैविध्य आणि पाण्याची कमतरता अशा विपरित परिस्थितीतही भारतातील कृषी क्षेत्राने जैन इरिगेशनच्या ठिबक सिंचनाच्या माध्यमातून भरीव कामगिरी केली आहे. हे लॅटीन-अमेरिकन देशांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे, अशा भावना लॅटीन अमेरिकेच्या सहा देशांतील राजदूत व तीन देशातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने व्यक्त केल्या आहे.

हे शिष्टमंडळ जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. ला भेट देऊन कंपनीच्या पाणी, शेती प्रक्रिया उद्योग व कारखाने शेती संदर्भातील विकसित तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी आले होते. जैन इरिगेशनमधील विकसित ठिबक आणि सुक्ष्म सिंचन पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी या समूहामध्ये बोलिव्हया, पनामा, इक्वाडोर, मेक्सिको, एल सल्वोडोर, क्यूबा, चिली, ब्राझील, कोस्टारिका या लॅटीन अमेरिकी देशांतील राजदूत तसेच लॅटीन अमेरिकेतील संपादक ॲल्फ्रेडो मोला यांचा समावेश होता. या शिष्टमंडळाने जैन इरिगेशनच्या जळगाव येथील विविध प्रकल्पांना भेट दिली.टॅग्स

संबंधित बातम्या