४ जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होणार; महाराष्ट्रात पाऊस लांबणार- स्कायमेट
14 May 14:15

४ जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होणार; महाराष्ट्रात पाऊस लांबणार- स्कायमेट


४ जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होणार; महाराष्ट्रात पाऊस लांबणार- स्कायमेट

कृषिकिंग, मुंबई: यावर्षीचा मान्सून महाराष्ट्रात उशीर दाखल होणार असल्याची माहिती स्कायमेटकडून देण्यात आली आहे. ४ जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज स्कायमेटकडून वर्तवण्यात आला आहे. तर १० जूनपर्यंत मुंबईत दाखल होणारा मान्सून लांबणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, यावर्षी सरासरीच्या ९३ टक्के पाऊस पडणार असल्याचंही स्कायमेटनं म्हटलं आहे. २२ मे रोजी मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल होणार आहे. त्यानंतर ४ जूनपर्यंत तो केरळमध्ये दाखल होईल तर जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल अशी माहितीही स्कायमेटकडून देण्यात आली आहे.

स्कायमेटच्या माहितीनुसार, १० जूनपर्यंत मान्सून मुंबईत दाखल होणार असा अंदाज होता, पण तो आता लांबणीवर जाणार आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असून, जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.टॅग्स

संबंधित बातम्या