केंद्रात नवीन सरकार आल्यानंतर कर्नाटकला दुष्काळ निधी मिळण्याची शक्यता
15 May 08:30

केंद्रात नवीन सरकार आल्यानंतर कर्नाटकला दुष्काळ निधी मिळण्याची शक्यता


केंद्रात नवीन सरकार आल्यानंतर कर्नाटकला दुष्काळ निधी मिळण्याची शक्यता

कृषिकिंग, नवी दिल्ली: कर्नाटकला दुष्काळ निधीसाठी केंद्रात नवीन सरकार स्थापन होण्याची वाट पाहावी लागणार आहे. राज्यातील अनेक जिल्हे दुष्काळाच्या कवेत आहे. केंद्रीय पथकाने कर्नाटकातील दुष्काळी भागाचा दौरा करून, आपला अहवाल केंद्रीय कृषी मंत्रालयाला सादर केला आहे. या अहवालावर आता केंद्र सरकारची उच्चस्तरीय समिती (एचएलसी) अंतिम निर्णय घेणार आहे. लोकसभा निवडणुकीमुळे सध्या देशभरात आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे नवीन सरकारची स्थापना होताच एचएलसीची बैठक होऊन कर्नाटकाला दुष्काळी मदत मिळण्याची शक्यता आहे.

कर्नाटक सरकारने दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारकडून २ हजार ०६४ कोटींच्या आर्थिक मदतीची मागणी केली आहे. कर्नाटक सरकारकडून ३० जिल्ह्यांमधील १५६ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. यामध्ये १०७ तालुक्यांमध्ये गंभीर तर ४९ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्यात दुष्काळामुळे जवळपास २०.४० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यासाठी आज (बुधवार) मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी हे जिल्ह्यांचे उपायुक्त, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहे.टॅग्स

संबंधित बातम्या