शेळ्या-मेंढ्यांसाठी राज्यात पहिली छावणी; छावणीत ५०० हुन अधिक शेळ्या-मेंढ्या
14 May 13:45

शेळ्या-मेंढ्यांसाठी राज्यात पहिली छावणी; छावणीत ५०० हुन अधिक शेळ्या-मेंढ्या


शेळ्या-मेंढ्यांसाठी राज्यात पहिली छावणी; छावणीत ५०० हुन अधिक शेळ्या-मेंढ्या

कृषिकिंग, सोलापूर: राज्य सरकारने मोठ्या जनावरांसाठी छावण्या सुरू केल्या. मात्र, शेळ्या-मेंढ्यांसारख्या छोट्या जनावरांसाठी काेणतीही उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे सोलापूर जिल्हाच्या सांगोला तालुक्यातील डोंगरगाव येथील डॉ.आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेने शेळ्या मेंढ्यांसाठी राज्यातील पहिली छावणी सुरू केली आहे.

डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेने १ मेपासून ही छावणी सुरू केली आहे. छावणीत जवळपास ५०० हुन अधिक शेळ्या-मेंढ्या दाखल झाल्या आहेत. दिवसभरात या शेळ्या-मेंढ्यांसाठी एक टँकर पाणी आणून हौदात सोडले जाते. त्यातून त्यांची तहान भागते. याशिवाय या शेळ्या-मेंढ्यांना दिवसभरात एक किलो तुरीचा भुसा व पाव किलो पेंड रोज दिली जाते. हे खाद्य उपलब्ध नसेल त्या वेळेस अर्धा किलो मका दिला जातो.

शेळ्या-मेंढ्यांच्या पिलांसाठी येथेच हायड्रोपोनिक चारा निर्मितीतून हिरवा चारा तयार केला जात आहे. १५० ट्रेमध्ये मकवान टाकून चारा पिकवला जाताे. हा चारा एक आठवड्यात एक फूट उंचीचा तयार होतो. एक किलो मक्‍यापासून आठ किलो हिरवा चारा तयार होतो.संबंधित बातम्या