चीनी दूध नकोच! भारताने आयात प्रतिबंध मर्यादा पुन्हा वाढवली
14 May 12:36

चीनी दूध नकोच! भारताने आयात प्रतिबंध मर्यादा पुन्हा वाढवली


चीनी दूध नकोच! भारताने आयात प्रतिबंध मर्यादा पुन्हा वाढवली

कृषिकिंग, नवी दिल्ली: भारत सरकारने चीनी दुधाच्या आयातीला नकार दिला असून, चीनमधून येणाऱ्या दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीवरील प्रतिबंध पुढील आदेश येईपर्यंत कायम राहणार असल्याचे जाहीर केले आहे. चिनी दुग्धपदार्थावरील बंदी कायम ठेवण्याचा निर्णय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणातर्फे (एफएसएसआय) घेण्यात आला आहे. चॉकलेट्स आणि इतर दुग्धजन्य पदार्थाचे उत्पादन करताना मेलॅमाईनची भेसळ होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

चीनमधून येणाऱ्या दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये मेलामीन रसायनाचा अंश आढळून आला होता. मेलामीन हे एक विषारी रसायन आहे. त्याचा वापर प्लॅस्टिक आणि खते बनवण्यासाठी केला जातो. त्यामुळे भारत सरकारने यापूर्वीच चीनमधून येणाऱ्या दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीला सप्टेंबर २००८ पासून प्रतिबंध घातलाय. तेव्हापासून आयातीवरील बंदी वेळोवेळी वाढण्यात आली आहे. अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने चिनी पदार्थावर घातलेली बंदी डिसेंबर २०१८ मध्ये संपली असून, त्याबाबत पुढील विचार विनिमय करण्यासाठी एफएसएसआयतर्फे बैठक घेण्यात आली.

या बैठकीत चीनमधून येणाऱ्या दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीवरील प्रतिबंध पुढील आदेश येईपर्यंत कायम राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मेलॅमाईनचा अंश तपासण्यासाठी आवश्यक असलेल्या अत्याधुनिक प्रयोगशाळा उपलब्ध नसल्याने पदार्थाची तपासणी करणे शक्य नाही, त्यामुळे बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.टॅग्स

संबंधित बातम्या