बागायती नाशिक जिल्ह्यातही शेतकरी होतायेत शहराकडे स्थलांतरीत
14 May 12:06

बागायती नाशिक जिल्ह्यातही शेतकरी होतायेत शहराकडे स्थलांतरीत


बागायती नाशिक जिल्ह्यातही शेतकरी होतायेत शहराकडे स्थलांतरीत

कृषिकिंग, नाशिक: राज्यातील बागायती जिल्हा म्हणून नाशिकची आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधील लोकांना भीषण दुष्काळामुळे शहराकडे स्थलांतरित व्हावं लागतंय. पाण्याचा आणि रोजगारचा प्रश्न निर्माण झाल्याने खेड्यापाड्यातील लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होऊ लागले आहे.

फोटोत दिसत असलेला संसार हा कोणी भिक्षुकांचा नाही तर आदिवासी शेतकरी आणि दुर्गम भागातील लोकांचा आहे. गावाकडे पडलेल्या भीषण दुष्काळामुळे नाशिकच्या त्रंबकेश्वर, हरसुल, पेठ या तालुक्यांमधील आदिवासी शेतकरी नाशिक शहराकडे स्थलांतरीत होत आहेत.

शहरात येऊन या शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेत आपला संसार थाटलाय. पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल अशा ठिकाणी उघड्यावर तीन दगडांची, मातीची चूल करून त्यावर स्वयंपाक करायचा आणि हाताला मिळेल ते काम करायचं. कामावर जाताना हा सारा संसार असाच रामभरोसे सोडून जावा लागतो, असा या स्थलांतरित लोकांचा दिनक्रम आहे.टॅग्स

संबंधित बातम्या