दुष्काळप्रश्नी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार- शरद पवार
14 May 10:17

दुष्काळप्रश्नी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार- शरद पवार


दुष्काळप्रश्नी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार- शरद पवार

कृषिकिंग, बीड: राज्यभरात यावर्षी भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे राजकीय मतभेद विसरून दुष्काळग्रस्त भागातील जनतेला सगळ्यांनी मिळून मदत कशी करता येईल, याचे नियोजन करण्याची गरज आहे. यासाठीच आपण राज्यातील दुष्काळी भागातील पाहणी करीत आहे. तसेच राज्यातील दुष्काळासंदर्भातील उपाययोजना सुचवण्या संदर्भात आपण येत्या आठ दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले आहे. बीड जिल्ह्यातील दुष्काळ दौऱ्यादरम्यान ते बोलत होते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सध्या दुष्काळी दौऱ्यावर असून, ग्रामीण भागातील परिस्थितीचा ते आढावा घेत आहे. सोमवारी सकाळपासून बीड जिल्ह्यात जिल्ह्यातील आष्टी, पाटोदासह अनेक गावांना त्यांनी भेट दिली. शेतकऱ्यांशी संवाद साधला. ग्रामीण भागात पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांसाठी चारा-पाण्याची टंचाई, सरकारने केलेली टँकर व्यवस्था याची पवारांनी माहिती जाणून घेतली.

ग्रामीण भागात कामे नसल्याने नागरिकांच्या हाताला रोजगार नाही. अनेक शेतकर्‍यांना पीक विमा मिळालेला नाही. अशा चारही बाजूने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळेच, अशा भीषण परिस्थितीत कोणतेही राजकारण न करता सरकारने शेतकर्‍यांना मदत करावी, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.टॅग्स

संबंधित बातम्या