जनावरांची संख्या लक्षात घेऊन वाढीव चारा छावण्या सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
13 May 18:17

जनावरांची संख्या लक्षात घेऊन वाढीव चारा छावण्या सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश


जनावरांची संख्या लक्षात घेऊन वाढीव चारा छावण्या सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

कृषिकिंग, मुंबई: सांगली जिल्ह्यातील १० तालुक्यांपैकी ५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी तात्पुरत्या व तातडीच्या उपाययोजना राबविण्यावर प्रशासनाने भर द्यावा. सध्या सांगलीत एकूण ४ चारा छावण्या सुरु असल्या तरी जनावरांची संख्या लक्षात घेऊन वाढीव चारा छावण्या सुरु कराव्यात, तसेच ज्या तालुक्यांमध्ये पाण्याच्या गरजेनुसार तेथे टँकर सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज (सोमवार) ऑडिओ ब्रिज प्रणालीद्वारे सांगली जिल्ह्यातील प्रामुख्याने जत, तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर-विटा या दुष्काळी तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक आणि जिल्हाधिकारी, गट विकास अधिकारी यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी जिल्हा प्रशासनाला हे निर्देश दिले आहे.

याशिवाय पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील जिरायती भागातील सरपंचांशीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ऑडिओ कॉन्फरन्स्द्वारे संवाद साधला आहे. तालुक्यातील पाणी टंचाई, चारा टंचाई, रोजगार हमीची कामे तसेच दुष्काळी प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. सरपंचानी गावाला भेडसावणारे प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम याप्रश्नी लक्ष घालून अहवाल द्यावा, अशी सुचना केली आहे.संबंधित बातम्या