२९ हजार गावात दुष्काळ...मग सरकारने सिंचनाची काय कामे केली?- राज ठाकरे
13 May 17:14

२९ हजार गावात दुष्काळ...मग सरकारने सिंचनाची काय कामे केली?- राज ठाकरे


२९ हजार गावात दुष्काळ...मग सरकारने सिंचनाची काय कामे केली?- राज ठाकरे

कृषिकिंग, ठाणे: "सरकार दुष्काळाच्या बाबतीत गंभीर नाहीये. नेते दुष्काळ दौरे करुन काय करतात, महानगरपालिका आणि राज्य सरकारचा फक्त पैसा खर्च करतात. माझा दुष्काळ दौऱ्याचा कुठलाही प्लॅन नाही. दुष्काळाचा सहल, पर्यटन म्हणून दौरा करण्यात अर्थ नाही", अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलीये. राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात आज मनसे पदाधिकाऱ्यांचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सरकार काय करत आहे? २९ हजार गावात दुष्काळ जाहीर करण्यात आला, मग सरकारने सिंचनाची काय कामे झाली? असा सवालही राज ठाकरे यांनी यावेळी सरकारला विचारला आहे. तर दुष्काळासाठी पाणी फाऊंडेशन आणि इतर सामाजिक संघटना काम करत आहेत. अभिनेता आमीर खान चांगले काम करत आहेत, त्यांचे अभिनंदनच आहे, पण जे काम सरकारने करायला हवे ते काम खासगी संस्थांना करावे लागत आहे. असे म्हणत राज यांनी सरकारच्या कामावर बोट ठेवले आहे.टॅग्स

संबंधित बातम्या