काँग्रेसची समिती आजपासून विदर्भाच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर
13 May 16:11

काँग्रेसची समिती आजपासून विदर्भाच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर


काँग्रेसची समिती आजपासून विदर्भाच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर

कृषिकिंग, मुंबई: विदर्भातील दुष्काळी भागाचा दौरा करण्यासाठी काँग्रेस आमदार व पदाधिकाऱ्यांची एक समितीच नेमल्यात आली आहे. ही समिती आजपासून (सोमवार, १३ मेपासून विदर्भाचा दौरा करत आहे. बुलडाण्यात १३ मे, अकोल्यात १४ मे तर वाशिममध्ये १५ मे रोजी प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे.

राज्याच्या बहुतांश भागात तीव्र स्वरूपाची दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर उपाय योजण्यात राज्य सरकार कमी पडत आहे, असा ठपका ठेवत काँग्रेसने सरकारची कोंडी करण्याची रणनीती या निमित्ताने आखली आहे. या समिती दौरा पूर्ण झाल्यानंतर आपला अहवाल प्रदेश काँग्रेसकडे सादर करायचा आहे.

सरकारचे मंत्री घोषणा करीत आहेत; मात्र प्रत्यक्षात उपाययोजना होताना दिसत नाही. ही बाब हेरून काँग्रेसने दुष्काळाच्या मुद्यावरून सरकारची कोंडी करण्याची तयारी चालविली आहे. काँग्रेसची ही समिती दुष्काळी दौरा करताना नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची परिस्थिती, जनावरांच्या पाण्याची व चाऱ्याची समजून घेईल. चारा छावण्यांना भेटी देईल. जनतेसाठी रोजगार उपलब्ध आहेत का, याची पाहणी करील. सर्व पाहणीनंतर समिती जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन उपाययोजना करण्याची मागणी करेल.टॅग्स

संबंधित बातम्या