स्टार्च मिल्स व्यावसायिक करताहेत युक्रेनकडून मोठ्या प्रमाणात मका आयात
14 May 08:30

स्टार्च मिल्स व्यावसायिक करताहेत युक्रेनकडून मोठ्या प्रमाणात मका आयात


स्टार्च मिल्स व्यावसायिक करताहेत युक्रेनकडून मोठ्या प्रमाणात मका आयात

कृषिकिंग, नवी दिल्ली: युक्रेनकडून भारतात नॉन-जीएम मकाची आयात केली जात आहे. विशेषतः स्टार्च मिल्स व्यावसायिक या मकाची आयात करत आहेत. आयात होत असली तरी त्याचा देशातंर्गत बाजारातील मकाच्या दरावर सध्यातरी कोणताही परिणाम पाहायला मिळत नाहीये. हा मका आयातदारांना सर्व खर्चासाहित १७५० ते १८०० रुपये प्रति क्विंटल दराने मिळत आहे.

दिल्लीचे मका व्यापारी कमलेश कुमार जैन यांनी सांगितले आहे की, "उत्पादक राज्य बिहारमधील बाजार समितींमध्ये सध्या मकाला १७०० ते १७५० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. तर दिल्लीत येऊन याच मकासाठी स्टार्च मिल्स व्यावसायिकांना १९५० ते २००० रुपये प्रति क्विंटलचा दर मोजावा लागत आहे. तर दक्षिण भारतीय राज्यांमध्ये मकाचा दर प्रति क्विंटलसाठी २००० रुपये प्रति क्विंटलसाठी अधिक आहे. त्यामुळे स्टार्च मिल्स व्यावसायिकांना आयातीत मका स्वस्त पडत असल्याने, ते मोठ्या प्रमाणात मकाची आयात करत आहे."

केंद्र सरकारने मागील महिन्यात १५ टक्के आयात शुल्काच्या दरात १ लाख टन मका आयातीला मंजुरी दिली आहे. त्याअंतर्गत स्टार्च मिल्स या मकाची आयात करत आहे. चालू खरीप हंगामात सामान्यच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने, अनेक राज्यांमध्ये मका पिकाचे नुकसान झाले. ज्यामुळे गुजरात, महाराष्ट्र सहित कर्नाटकातील मका साठा कमी होऊन दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती.टॅग्स

संबंधित बातम्या