सततची नापिकी आणि कर्जाच्या वाढत्या डोंगराला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
13 May 12:49

सततची नापिकी आणि कर्जाच्या वाढत्या डोंगराला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

सततची नापिकी आणि कर्जाच्या वाढत्या डोंगराला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

कृषिकिंग, बीड: बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यातील तेलगाव येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आलीये. संदिपान रामनाथ इके या ६५ वर्षीय शेतकऱ्याने सततची नापिकी आणि कर्जाच्या वाढत्या डोंगराला कंटाळून आपलं जीवन संपवलं आहे.

संदिपान इके यांच्याकडे ग्रामीण बँकेचे कर्ज होते. गेल्या काही दिवसांत पडलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे कर्जाचा वाढता डोंगर असह्य झाल्याने चिंताग्रस्त व तनावात ते वावरत होते. असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. याच तणावात त्यांनी रविवारी दुपारी इके यांनी स्वत:च्या शेता-शेजारील आंब्याच्या झाडाला गळफास घेत जीवनयात्रा संपवलीये. सर्वांशी मिळून मिसळून राहण्याच्या वृत्ती असलेल्या इके यांचा दुष्काळामुळे बळी गेल्यामुळे तेलगाव परिसरात हळहळ व्यक्त होतीये.संबंधित बातम्या