भरलेला टँकर ६० फूट विहिरीत कोसळला; मोसंबीच्या बागेसाठी आणत होता दररोज पाणी
13 May 12:20

भरलेला टँकर ६० फूट विहिरीत कोसळला; मोसंबीच्या बागेसाठी आणत होता दररोज पाणी

भरलेला टँकर ६० फूट विहिरीत कोसळला; मोसंबीच्या बागेसाठी आणत होता दररोज पाणी

कृषिकिंग, औरंगाबाद: औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील बालानगर शिवारात कोरड्या पडलेल्या विहिरीत पाणी टाकत असताना भरलेला खासगी टँकर कोसळल्याची घटना समोर आली आहे. टँकरच्या चालकाने प्रसंगावधान राखून वेळीच उडी मारल्याने या अपघातात जीवितहानी टळली. मात्र यात टँकरचे माेठे नुकसान झाले आहे. तलाठी दिलीप मानघरे यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला आहे.

बालानगर गावचे शेतकरी रहेमान करीम कुरेशी यांनी आपल्या शेतात चारशे मोसंबीची झाडे लावलीये. उन्हाळ्यात ही सर्व झाडे जगवण्यासाठी कुरेशी हे खासगी टँकरने दररोज विकत पाणी आणून विहिरीत टाकीत होते. नेहमीप्रमाणे टँकर पाण्याने भरून आले असता हे पाणी विहिरीत टाकण्यासाठी टँकर मागे घेत असताना चालकाला अंदाज न आल्यामुळे टँकर विहिरीत कोसळले. टँकरचालकाने तात्काळ खाली उडी मारल्याने तो बचावला आहे.टॅग्स

संबंधित बातम्या