दुष्काळाच्या झळा; पाणी नाही म्हणून केळीच्या बागेत सोडली जनावरे
13 May 11:58

दुष्काळाच्या झळा; पाणी नाही म्हणून केळीच्या बागेत सोडली जनावरे


दुष्काळाच्या झळा; पाणी नाही म्हणून केळीच्या बागेत सोडली जनावरे

कृषिकिंग, अकोला: अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुका परदेशात केळी निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र यावर्षी दुष्काळामुळे विहिरी, बोअरने तळ गाठले. लाखो रुपये खर्च करून जगवलेली केळीची झाडे आता डोळ्यादेखत सुकत असल्याचे पाहून शेतकरी वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यापैकी एका शेतकऱ्याने तर चक्क वाळलेल्या केळीच्या शेतात गुरे सोडून त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था केलीये.

अकाेला जिल्ह्यातील हिवरखेडपासून (ता. तेल्हारा) चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कार्ला शेतकरी श्रीकृष्ण अशोक कारोडो यांची केळीची बाग. या बागेला आता पाणी पुरत नाही, बोअरचे पाणी आटले. पिकांसाठी दीड लाख रुपये खर्च झाला. पिके वाळली, या शेतात गुरे सोडू नाही तर काय करू?’ असे शेतकरी श्रीकृष्ण अशोक कारोडो यांनी यावेळी सांगितले आहे. त्यामुळे उत्पादनाच्या बाबतीत सिंचनाच्या सोयी-सुविधा असलेल्या अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात दुष्काळाची ही विदारक परिस्थिती सध्या पाहायला मिळतिये.टॅग्स

संबंधित बातम्या