सरकार दुष्काळाशी लढा देण्यात कमी पडलंय- शरद पवार
13 May 10:29

सरकार दुष्काळाशी लढा देण्यात कमी पडलंय- शरद पवार


सरकार दुष्काळाशी लढा देण्यात कमी पडलंय- शरद पवार

कृषिकिंग, सातारा: "दुष्काळी परिस्थिती आल्यावर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी शासनाच्या काळात ऑगस्टमध्ये निर्णय घेण्यात येत होते. परंतु आताच्या सरकारने यावर्षीचा दुष्काळ गांभीर्याने घेतलाच नाही. हे सरकार दुष्काळाशी लढा देण्यास कमी पडले असून, त्यांची पावले कासवगतीने पडत आहेत," अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील म्हसवड येथे बारामती अ‍ॅग्रोच्या वतीने तालुक्यातील जनतेची तहान भागवण्यासाठी तीस पाण्याचे टँकर देण्यात आले आहेत. या टँकरच्या प्रारंभानंतर पवार बोलत होते. पवार काल (रविवार) संपूर्ण दिवसभर माण दौऱ्यावर होते.

आपण दुष्काळाच्या कठीण परिस्थितीला सामोरे जात आहोत. लोकांच्या अनेक तक्रारी ऐकायला मिळाल्या. त्यामध्ये जनावरे आणि माणसांना पाणी नाही. रोजगार आणि रेशनवरही धान्य नाही. जनवारांना चारा मिळेना अशी स्थिती आहे. पुढील अडीच महिन्यांचा काळ जायचा कसा, पाणी कोठून आणायचे, हा प्रश्न आहेच. राज्यात दुष्काळाचे संकट मोठे आहे. त्यामुळे राज्यातील वेगवेगळ्या चांगल्या संस्था, कारखानदारांनी दुष्काळग्रस्तांना मदतीचा हातभार लावावा. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.टॅग्स

संबंधित बातम्या