केंद्रीय पथक ओडिशाच्या नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार
11 May 17:55

केंद्रीय पथक ओडिशाच्या नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार


केंद्रीय पथक ओडिशाच्या नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार

कृषिकिंग, नवी दिल्ली: फनी चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक ओडिशात जाणार आहे. कृषी मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "ओडिशातील पाहणी दौऱ्यासाठी पथकाची निवड करण्यात आली आहे. हे पथक येत्या एक-दोन दिवसांत आपत्तीग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करून नुकसानीचा आढावा घेणार आहे."

दरम्यान, हे केंद्रीय पथक आंध्रप्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा दौरा करणार नाही. या राज्यांमध्ये फार काही नुकसान झालेलं नाही. असेही या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

एका आठवड्यापूर्वी ओडिशाच्या किनारपट्टी भागाला फनी चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. ओडिसा सरकारच्या प्राथमिक अंदाजानुसार, या चक्रीवादळात ओडिशातील ३० टक्क्यांपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले आहे. ओडिसा सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, राज्यातील १४ जिल्ह्यांमधील १ लाख हेक्टर क्षेत्रावरील शेती मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे.टॅग्स

संबंधित बातम्या