दुष्काळ असूनही महाराष्ट्राचं पाणी गुजरातला वळवलं; मनसेचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
11 May 15:08

दुष्काळ असूनही महाराष्ट्राचं पाणी गुजरातला वळवलं; मनसेचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

दुष्काळ असूनही महाराष्ट्राचं पाणी गुजरातला वळवलं; मनसेचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

कृषिकिंग, मुंबई: राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना महाराष्ट्राच्या हक्काचं पाणी गुजरात दिलं जात असल्याचा आरोप मनसेने मुख्यमंत्र्यांवर केला आहे. राज्यातील ४६ टीएमसी पाणी गुजरातला वळवण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेली माहिती खोटी आहे. असा आरोप मनसेचे नेते आणि माजी आमदार नितीन भोसले यांनी केला आहे.

महाराष्ट्रातील १३ तालुक्यांमध्ये भीषण दुष्काळ असतानाही राज्याच्या हक्काचं पाणी गुजरातच्या शेतीसाठी दिलं जात आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचा काळात असा कोणताही करार झालेला नाही. मुख्यमंत्री जाहीर भाषणात खोटी माहिती देत जनतेची दिशाभूल करत आहे. मोदी-शाह जोडीला खुश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पाणी दिलं आहे. असा गंभीर आरोपही नितीन भोसले यांनी केला आहे.टॅग्स

संबंधित बातम्या