शेतकऱ्यांच्या अनुदानातून बॅंकांनी कर्जाचे हप्ते वळते करू नका- मुख्यमंत्री
11 May 11:37

शेतकऱ्यांच्या अनुदानातून बॅंकांनी कर्जाचे हप्ते वळते करू नका- मुख्यमंत्री


शेतकऱ्यांच्या अनुदानातून बॅंकांनी कर्जाचे हप्ते वळते करू नका- मुख्यमंत्री

कृषिकिंग, मुंबई: शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानाच्या रकमेतून त्यांच्या कृषी कर्जाचे हप्ते वळते करू नयेत. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना सक्त सूचना द्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक जिल्ह्याच्या दुष्काळ आढावा बैठकीत दिले. वर्षा निवासस्थानाहून शुक्रवारी त्यांनी ऑडियो ब्रीजद्वारे नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील सरपंच व अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

नाशिक जिल्ह्यातील सुमारे ३५ सरपंचांशी मोबाईलवरुन थेट संवाद साधून त्यांच्याशी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसंदर्भात यावेळी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. तसेच पाणी टंचाईच्या अडचणी समजून घेतल्या. मुख्य सचिव युपीएस मदान आणि अन्य वरिष्ठ अधिकारीही यावेळी उपस्थित होते.

दुष्काळी जिल्ह्यांमध्ये रोजगार हमीयोजने अंतर्गत जास्तीत कामे सुरु करा, तीन दिवसात या कामांना मंजुरी द्या, असे निर्देश त्यांनी अहमदनगर जिल्ह्याच्या दुष्काळ आढावा बैठकीत दिले. आचारसंहितेचे कारण देऊन दुष्काळावरील उपाययोजनांची कामे प्रलंबित ठेऊ नयेत, असेही निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले आहे.



टॅग्स

संबंधित बातम्या