पाच वर्षांपासूनच्या ऊस बिल थकबाकीचं काय?
12 May 14:50

पाच वर्षांपासूनच्या ऊस बिल थकबाकीचं काय?


पाच वर्षांपासूनच्या ऊस बिल थकबाकीचं काय?

कृषिकिंग, पुणे: साखर आयुक्तालयाकडून राज्यातील एफआरपी थकवलेल्या कारखान्यांवर रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट (आरआरसी) अंतर्गत कारवाई सुरू केली आहे. मात्र, ही कारवाई केवळ या हंगामातील थकबाकीची आहे, यापूर्वी राज्यातील काही कारखान्यांनी पाच वर्षांपासून एफआरपीची काही रक्कम थकीत ठेवली आहे. ही रक्कम जवळपास अडीचशे कोटींच्या घरात जाते. त्यामुळे सध्याच्या कारवाईबरोबर जुन्या थकबाकीसाठीही कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राज्यात ३१ साखर कारखान्यांकडे २०११ पासूनची थकबाकी आहे. याची एकूण रक्कम आता २४९ कोटी ५२ लाख रुपये होते. बीडचा जय भवानी साखर कारखाना, सातारचा रयत साखर कारखाना या कारखान्यांकडे तर त्यापूर्वीचीही थकबाकी आहे. यावर्षीच्या हंगामात देखील दोन्ही कारखान्यांकडे ऊस बिले थकीत आहेत. त्यात जयभवानी कारखान्याची साखरही जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे सध्याच्या कारवाईबरोबर जुन्या थकबाकीसाठीही कारवाई होणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत राज्यात ऊस बिलांचे २२ हजार ४२ कोटी रुपय देय होते. पैकी १८ हजार ८२१ कोटी २२ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा झाले आहेत. राज्यातील हंगाम संपल्यानंतरही ३ हजार ६०७ कोटी ५२ लाख रुपयांची थकबाकी कारखान्यांकडे आहे. राज्यात यावर्षी १९५ पैकी केवळ ४३ साखर कारखान्यांनीच शेतकऱ्यांना पूर्ण एफआरपी अदा केली आहे.टॅग्स

संबंधित बातम्या