चालू महिन्यापासूनच बरसणार मुसळधार पाऊस; आयएमडीचा इशारा
10 May 15:53

चालू महिन्यापासूनच बरसणार मुसळधार पाऊस; आयएमडीचा इशारा


चालू महिन्यापासूनच बरसणार मुसळधार पाऊस; आयएमडीचा इशारा

कृषिकिंग, नवी दिल्ली: देशभरातील शेतकऱ्यांसह, सामान्य नागरिकांसाठी एक खुशखबर आहे. अल निनोचा प्रभाव कमी झाला असून, लवकरच मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे. अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. तसेच अल निनो पुढे सरकण्याची शक्यताही खूपच कमी असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुढील महिन्यात अल निनोचा प्रभाव कमी होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

यावर्षी सरासरीच्या ९६ टक्के पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून याआधीच वर्तवण्यात आली आहे. गेल्या वर्षी अल निनोच्या प्रभावामुळे योग्य प्रमाणात पाऊस पडला नाही. दरम्यान, जून महिन्यातील पहिल्या आठवड्यात हवामान विभागाकडून मॉन्सून संदर्भातील पुढील माहिती दिली जाणार आहे.
टॅग्स

संबंधित बातम्या