महाराष्ट्रात बीटापासून साखर उत्पादन करण्यासाठी शरद पवारांचा 'गोडप्लॅन'
08 May 16:55

महाराष्ट्रात बीटापासून साखर उत्पादन करण्यासाठी शरद पवारांचा 'गोडप्लॅन'


महाराष्ट्रात बीटापासून साखर उत्पादन करण्यासाठी शरद पवारांचा 'गोडप्लॅन'

कृषिकिंग, पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी काल (७ एप्रिल) पंजाबच्या अमृतसर येथील बुट्टेर सेवियाँ गावातील राणा शुगर्सला भेट दिली. बीटापासून साखर उत्पादन हा ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांसाठी महत्त्वाचा प्रयोग ठरेल, असे पवार यांनी या भेटी दरम्यान म्हटले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बीटापासून साखर उत्पादन करण्याचा पवारांचा 'गोडप्लॅन' असल्याचे समोर आले आहे.

पंजाबच्या अमृतसर येथील राणा शुगर्सचे राणा गुरुजीत सिंग यांनी बीटापासून साखर उत्पादनाचा प्रयोग यशस्वी केला आहे. शरद पवार यांनी आपले नातू आणि भारतीय साखर कारखाना संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांच्यासह राणासिंग यांच्या कारखान्याला भेट दिली. राणासिंग यांनी यशस्वीपणे केलेल्या संशोधनाबद्दल राणा सिंग, त्यांचे चिरंजीव आणि संपूर्ण टीमचे पवार यांनी यावेळी अभिनंदन केले. तसेच महाराष्ट्रातही हा प्रयोग यशस्वी करुन दाखवायची इच्छा बोलून दाखवली आहे.

''या प्रयोगामुळे गळीत हंगाम दोन ते तीन महिने वाढवला जाऊ शकतो. तसेच ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांना या प्रयोगामुळे मोठा दिलासा मिळू शकेल, अशी मला आशा आहे'' असेही पवार यांनी यावेळी म्हटले आहे.



टॅग्स

संबंधित बातम्या