यावर्षी १४७ लाख टन अतिरिक्त साखरेचा साठा शिल्लक राहण्याची शक्यता- इस्मा
09 May 08:30

यावर्षी १४७ लाख टन अतिरिक्त साखरेचा साठा शिल्लक राहण्याची शक्यता- इस्मा


यावर्षी १४७ लाख टन अतिरिक्त साखरेचा साठा शिल्लक राहण्याची शक्यता- इस्मा

कृषिकिंग, पुणे: लागोपाठ २ वर्ष विक्रमी उत्पादन झाल्याने देशात यावर्षी देशात जवळपास १४७ लाख टन साखरेचा साठा शिल्लक राहील, असा अंदाज इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) व्यक्त केला आहे. तर महाराष्ट्रात जवळपास ६० लाख टन साखर शिल्लक राहील, असे सांगण्यात येत आहे.

यावर्षी देशातील साखर उत्पादन ३२२ लाख टनांपर्यंत पोहोचले आहे. गेल्या वर्षीच्या (२०१७-१८) हंगामात देशात ३२० लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. त्यावेळच्या विक्रमी साखर उत्पादनामुळे देशात १०७ लाख टन साखर शिल्लक होती. तर, महाराष्ट्रात गेल्या वर्षीच्या हंगामात १०७ लाख २० हजार टन साखर उत्पादित झाली होती. हंगाम सुरू होण्यापूर्वी ऑक्टोबर २०१८ मध्ये राज्यात तब्बल ५३.३६ लाख टन साखर राज्यात होती. यावर्षीच्या हंगामातही राज्यात १०७ लाख १० हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. परिणामी, तब्बल ६० लाख टन साखर शिल्लक राहील. असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

यावर्षी देशात ३३० लाख टन साखर उत्पादन होईल. तर देशांतर्गत साखरेचा खप २६० लाख टन इतका आहे. उत्पादित साखरेपैकी ३० लाख टन साखरेची निर्यात होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे यावर्षीचा आणि गतवर्षीचा शिल्लक साठ्यामुळे यावर्षी १४७ लाख टन साखर शिल्लक राहील, असे साखर उद्योगाकडून सांगितले जात आहे.टॅग्स

संबंधित बातम्या