यावर्षी मध्यम पावसाची शक्यता; राजाची गादी कायम राहणार: भेंडवळीची भविष्यवाणी
08 May 10:02

यावर्षी मध्यम पावसाची शक्यता; राजाची गादी कायम राहणार: भेंडवळीची भविष्यवाणी


यावर्षी मध्यम पावसाची शक्यता; राजाची गादी कायम राहणार: भेंडवळीची भविष्यवाणी

कृषिकिंग, बुलढाणा: संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेली आणि सुमारे साडे तीनशे वर्षाची परंपरा लाभलेली बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुकामध्ये वसलेल्या भेंडवळ घटमांडणीची भविष्यवाणी आज ८ मे रोजी पहाटे सहा वाजता जाहीर झाली. यामध्ये नैसर्गिक संकटांची सरबत्ती, पाऊस मध्यम स्वरूपाचा तर पिके सर्वसाधारण सांगितले असल्याने शेतकऱ्यांना यावर्षी फारशी चांगली भविष्यवाणी नसल्याचे दिसून आले.

पिक परिस्थिती सर्वसाधारण सांगितले असून, पाऊसही सर्वसाधारण आणि लहरी स्वरूपाचा सांगितलेला आहे. पावसाची परिस्थिती पाहता जून महिन्यामध्ये साधारण पाऊस राहील. पहिला महिना साधारण पाऊस, कुठे कमी, कुठे जास्त सार्वत्रिक पाऊस होणार नाही. दुसरा महिना चांगला पाऊस होईल. तिसरा महिना कमी जास्त पाऊस होईल, मात्र पहिल्या महिन्याच्या तुलनेत नक्कीच जास्त पाऊस पडेल. चौथा महिना मात्र लहरी स्वरुपाच्या पावसाचा राहील. यावर्षी अवकाळी पाऊस पडणे शक्य आहे.

याशिवाय राजकीय भविष्यवाणीमध्ये राजाची गादी आणि राजा कायम राहणार असून, पुन्हा एकदा देशाला स्थिरतेचे संकेत दिले आहेत. मात्र, देशाला आर्थिक संकटांना सामोरे जावं लागू शकतं, असंही भाकीत या भविष्यवाणीत मांडण्यात आलं आहे.संबंधित बातम्या