साखर आयुक्तांचा दणका; राज्यातील १४ कारखान्यांवर जप्तीचे आदेश
07 May 14:20

साखर आयुक्तांचा दणका; राज्यातील १४ कारखान्यांवर जप्तीचे आदेश


साखर आयुक्तांचा दणका; राज्यातील १४ कारखान्यांवर जप्तीचे आदेश

कृषिकिंग, पुणे: थकीत एफआरपी प्रकरणी राज्यातील १४ साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी दणका दिलाय. या १४ साखर कारखान्यांवर आयुक्तांकडून जप्तीच्या कारवाईचे आदेश देण्यात आले आहे. २५१ कोटींच्या थकीत एफआरपीच्या वसुलीसाठी त्या- त्या जिल्ह्यांच्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधीचे आदेश देण्यात आले आहेत.

सद्यस्थितीत राज्यात एकूण ३ हजार ५९५ कोटी रुपये इतकी थकीत एफआरपी आहे. ही थकबाकी शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून वारंवार करण्यात आली. त्यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी २ मे रोजी थकीत एफआरपीवरून साखर आयुक्तांना, तर दुष्काळावरून विभागीय आयुक्तांना भेटून यासंदर्भांत जाब विचारणार आहे. असा इशारा दिला होता.

त्याप्रमाणे राजू शेट्टी यांनी काल (सोमवारी) साखर आयुक्तांची भेट घेतली होती. शेट्टी यांच्या कालच्या भेटीनंतर साखर आयुक्तांकडून आता हे जप्तीचे आदेश देण्यात आले आहे.टॅग्स

संबंधित बातम्या