ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींकडून हवाई पाहणी; तात्काळ १ हजार कोटींची मदत जाहीर
06 May 12:55

ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींकडून हवाई पाहणी; तात्काळ १ हजार कोटींची मदत जाहीर


ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींकडून हवाई पाहणी; तात्काळ १ हजार कोटींची मदत जाहीर

कृषिकिंग, भुवनेश्वर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'फनी' चक्रीवादळामुळे ओडिशामध्ये झालेल्या नुकसानीचा आणि परिस्थितीचा आज (सोमवार) आढावा घेतला. पंतप्रधानांनी यावेळी वादळामुळे प्रभावित असलेल्या भागांची हेलिकॉप्टरद्वारे पाहणी केली. फनी वादळाच्या तडाख्यामधून सावरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशाला तात्काळ १ हजार कोटींची मदत जाहीर केली आहे.

यावेळी माध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "वादळाचा सामाना करण्यासाठी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी चांगले काम केले आहे. प्रशासनाच्या उत्तम नियोजनामुळे ओडिशामध्ये मोठी जीवितहानी टळली आहे. केंद्र सरकार या संकटाचा सामना करण्यासाठी ओडिशा सरकारसोबत आहे."

शुक्रवारी (३ मे) ओडिशामध्ये आलेल्या फनी या वादळामुळे राज्यात मोठं नुकसान झालं आहे. राज्यातील ११ जिल्ह्यांमधील १४,८३५ गावांमधील जवळपास १.८ कोटी लोकांचं नुकसान झालं आहे. राज्यात ३० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी काही भागांमध्ये खाद्य सुरक्षा कायद्या अंतर्गत येणाऱ्या कुटुंबियांसाठी ५० किलो तांदुळ, २००० रोख आणि पॉलिथीन शीट देण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. याशिवाय चक्रीवादळामुळे पूर्णपणे नष्ट झालेल्या घरांसाठी ९५ हजार १०० रुपये तर कमी नुकसान झालेल्या घरांसाठी ५ हजार २०० रुपये आणि किरकोळ नुकसान झालेल्या घरांसाठी ३ हजार २०० रुपयांची मदत देण्याचीही घोषणाही पटनायक यांनी केली आहे.टॅग्स

संबंधित बातम्या