प्रथमच एफआरपीचा देय आकडा ४ हजार कोटींच्या खाली- साखर आयुक्त
06 May 10:52

प्रथमच एफआरपीचा देय आकडा ४ हजार कोटींच्या खाली- साखर आयुक्त


प्रथमच एफआरपीचा देय आकडा ४ हजार कोटींच्या खाली- साखर आयुक्त

कृषिकिंग, पुणे: राज्यातील १९५ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना उसाची एफआरपीची एकूण २२ हजार ४२ कोटी रुपये देणे अपेक्षित होते. मात्र, त्यातील १८ हजार ८२१ कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची एफआरपी ३ हजार ६०७ कोटी रुपये रक्कम अजूनही थकीत आहे, अशी माहिती साखर आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे.

एप्रिल अखेरीस राज्यातील साखर कारखान्यांनी ९४९ लाख टन एवढ्या उसाचे गाळप केले आहे. त्यावर देय असलेल्या एफआरपीच्या रक्कमेपैकी ८५ टक्के रक्कम एप्रिल अखेरीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झालीये . मात्र, अजूनही राज्यातील शेतकऱ्यांची ३ हजार ६०७ कोटी एफआरपीची रक्कम थकित आहे. २०१८-१९ या उस गाळप हंगामामध्ये प्रथमच एफआरपीचा देय आकडा चार हजार कोटी रुपयांच्या खाली आला आहे, असेही साखर आयुक्तालयाकडून सांगण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना थकबाकीची रक्कम तात्काळ मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. केंद्र शासनाच्या सॉफ्टलोन योजनेतून राज्यातील कारखान्यांना कर्ज मंजूर झाले आहे. कर्जाची रक्कम मिळताच थकीत एफआरपी आणखी कमी होईल. असेही साखर आयुक्तालयाकडून सांगण्यात आले आहे.टॅग्स

संबंधित बातम्या