'फनी' चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकलं; पुरी शहरात मुसळधार पावसाला सुरुवात
03 May 10:53

'फनी' चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकलं; पुरी शहरात मुसळधार पावसाला सुरुवात

'फनी' चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकलं; पुरी शहरात मुसळधार पावसाला सुरुवात

कृषिकिंग, भुवनेश्वर(ओडिसा): बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं 'फनी' चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीला धडकलं आहे. त्यामुळे पुरी, भुवनेश्वर, गजपती, केंद्रपारा आणि जगतपूर सिंह या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. समुद्रात उंच लाटा उसळू लागल्या आहेत.

हे चक्रीवादळ १७५ किलोमीटर प्रति तासापेक्षा अधिक वेगानं ओडिशात धडकलं आहे. ओडिशानंतर हे वादळ आता पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला धडकणार आहे. खबरदारी म्हणून ओडिशाच्या समुद्र किनाऱ्यावरील जवळपास ११ लाख लोकांना आतापर्यंत सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. राज्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर घराबाहेर न पडण्याचं आवाहन ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी नागरिकांना केले आहे. याशिवाय कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी नौदल, हवाई दल आणि कोस्टगार्ड सज्ज ठेवण्यात आले आहेत.टॅग्स

संबंधित बातम्या