साखर निर्यातीचे लक्ष्य अपूर्ण राहण्याची शक्यता
05 May 13:00

साखर निर्यातीचे लक्ष्य अपूर्ण राहण्याची शक्यता


साखर निर्यातीचे लक्ष्य अपूर्ण राहण्याची शक्यता

कृषिकिंग, पुणे: देशात साखरेचा अतिरिक्त साठा आहे. त्यामुळे त्याचा दरांवर परिणाम होत असून, साखर उद्योग संकटात आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने यावर पर्याय म्हणून निर्यातीचा मार्ग सुचवला होता. त्यानुसार साखर कारखान्यांना यावर्षी ५० लाख टन साखर निर्यात करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. पण, हे लक्ष्य पूर्ण होणे दुरापास्त असल्याचे साखर उद्योगातील जाणकारांचे म्हणणे आहे.

देशातील साखर कारखान्यांनी एप्रिल अखेरपर्यंत केवल २३ लाख टन साखर निर्यात केली आहे. कारखान्यांना देण्यात आलेल्या ५० लाख टन टार्गेटच्या केवळ ४६ टक्के साखर निर्यात झाली आहे. त्यामुळे हंगामाच्या पुढील पाच महिन्यांतील निर्यातीवर साखर उद्योगाची भवितव्य अवलंबून आहे. देशात काही राज्यांत पाणी टंचाई किंवा दुष्काळी स्थिती असली तरी, सलग दुसऱ्या वर्षी ३२५ लाख टन साखर तयार होण्याची शक्यता आहे. ही साखर म्हणजे, सध्याच्या अतिरिक्त साठ्यामध्ये भर घालणारी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त साखर निर्यात होणे गरजेचे आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत लक्ष्यानुसार साखर निर्यात झाली नाही तर साखर उद्योगाची स्थिती खूपच बिकट होईल, असे मत जाणकार व्यक्त करत आहेत.टॅग्स

संबंधित बातम्या