'फनी' चक्रीवादळ ओडिशाच्या दिशेने; ८ लाख लोकांचं स्थलांतर
02 May 11:14

'फनी' चक्रीवादळ ओडिशाच्या दिशेने; ८ लाख लोकांचं स्थलांतर


'फनी' चक्रीवादळ ओडिशाच्या दिशेने; ८ लाख लोकांचं स्थलांतर

कृषिकिंग, भुवनेश्वर: बंगालच्या उपसागरातील फनी हे वादळ सध्या झपाट्याने ओडिसाच्या दिशेने सरकत असून, शुक्रवारी (३ मे) हे वादळ जगन्नाथ पुरीच्या किनाऱ्यावर थडकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

जगन्नाथ पुरी येथे थडकताना ताशी १७५ किलोमीटर वेगाने वारे वाहतील. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ओडिशाच्या किनारपट्टीतील जिल्ह्यांतील ८ लाखांहून अधिक नागरिकांना स्थलांतरीत करण्याचे आदेश मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी दिले आहेत. फनी वादळ ताशी सहा किलोमीटर वेगाने ओडिशाकडे सरकत आहे.

फनी वादळामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीशी झुंज देण्यासाठी नौदल, हवाई दल, तटरक्षक दल यांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. हवामान विभागाने यलो वॉर्निंग जारी केली आहे. ओडिसातील शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यास राज्य सरकारने सांगितले आहे. याशिवाय वादळापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी ८८० छावण्या उभारण्यात आल्या आहेत.टॅग्स

संबंधित बातम्या