अनुदान दिल्याशिवाय आगामी हंगाम सुरू होणे अशक्य- हसन मुश्रीफ
30 April 18:05

अनुदान दिल्याशिवाय आगामी हंगाम सुरू होणे अशक्य- हसन मुश्रीफ


अनुदान दिल्याशिवाय आगामी हंगाम सुरू होणे अशक्य- हसन मुश्रीफ

कृषिकिंग, कोल्हापूर: "साखरेला मागणीच नसल्याने यावर्षी साखर उद्योग पुरता संकटात सापडलाय. त्यामुळे राज्य व केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची गरज आहे. कारखान्यांना कर्जे देण्याऐवजी अनुदान दिल्याशिवाय येणारा हंगाम सुरू होणे अशक्य आहे. त्यासाठी ‘जीएसटी’पोटी केंद्र सरकारने घेतलेले पोत्यामागे १५५ रुपये अनुदान म्हणून परत करावेत," अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील ८ कारखान्यांनी एक कणही साखरेची विक्री अद्याप केलेली नाही, कसा व्यवसाय करायचा? येणाऱ्या हंगामापर्यंत देशात १८५ लाख टन साखर शिल्लक राहणार आहे. नवीन साखर उत्पादन सुरू झाले तर ठेवायचे कोठे? इथेनॉलचा पर्याय चांगला असला तरी त्या मशिनरी उभारण्यासाठी कर्जे कोण देणार? त्यामुळेच सरकारने आता हस्तक्षेप करण्याची आवशक्यता आहे. असेही मुश्रीफ यावेळी म्हणाले आहे.

यापूर्वीच्या तीन हंगामातील कर्जाचे हप्ते फेडायचे आहेत. त्याशिवाय आगामी हंगामाच्या तयारीसाठी कर्जे घ्यावी लागणार आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा कर्जे घेणे शक्य नसून, आता अनुदान म्हणूनच पैसे द्यावे. अशी मागणी त्यांनी केली आहे.



टॅग्स

संबंधित बातम्या