इंडोनेशियात पुराचा हाहाकार; २९ जणांचा मृत्यू तर अनेक जण बेपत्ता
30 April 12:33

इंडोनेशियात पुराचा हाहाकार; २९ जणांचा मृत्यू तर अनेक जण बेपत्ता


इंडोनेशियात पुराचा हाहाकार; २९ जणांचा मृत्यू तर अनेक जण बेपत्ता

कृषिकिंग, जकार्ता: इंडोनेशियामध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामध्ये आतापर्यंत २९ जणांचा मृत्यू झालाय. तर अनेक जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात इंडोनेशियाच्या आपत्कालीन यंत्रणेने सोमवारी (२९ एप्रिल) २९ जणांचा मृत्यू, १३ जण बेपत्ता असल्याची माहिती प्रसिद्ध केली आहे.

इंडोनेशियाच्या लामपुंग प्रांतात मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन त्यामध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. तर जकार्ताच्या आजूबाजूच्या परिसरात आलेल्या पुरामुळे दोन जणांचा मृत्यू झाला होता. जवळपास दोन हजारांहून अधिक जणांना घरातून बाहेर पडावे लागले आहे. सुमात्राच्या बेंग्कुलू प्रांतात पाणी साचल्याने १२ हजार नागरिकांना बाहेर काढावे लागले. तसेच अनेक इमारती, पूल आणि रस्त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

आपत्कालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जयपुरा परिसरातील पूरग्रस्त गावांना भेटी दिल्या. या परिसरातील घरे, रस्ते, पूल आणि इतर ठिकाणांचे पुरामुळे मोठे नुकसान झाले होते. पूर आणि भूस्खलनामुळे ११६ जण जखमी झाले असून, त्यातील ४१ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देण्यात आली आहे.संबंधित बातम्या