'फनी' चक्रीवादळ ४ दिवसांत धडकणार; दक्षिणेकडील राज्यांत जोरदार पावसाची शक्यता
30 April 10:17

'फनी' चक्रीवादळ ४ दिवसांत धडकणार; दक्षिणेकडील राज्यांत जोरदार पावसाची शक्यता


'फनी' चक्रीवादळ ४ दिवसांत धडकणार; दक्षिणेकडील राज्यांत जोरदार पावसाची शक्यता

कृषिकिंग, नवी दिल्ली: फनी चक्रीवादळ येत्या दोन दिवसात रौद्र रूप धारण करण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार फनी चक्रीवादळ सोमवारी रात्री बंगालच्या उपसागरात पोहचले असून, ते चेन्नईपासून ७०० किमी अंतरावर होतं. त्यानंतर १८ किमी प्रतितास वेगानं वादळ किनाऱ्याकडे सरकत आहे. याचा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे.

येत्या दोन दिवसांत तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या दिशेने येईल. त्यानंतर पुढे ओडिशाच्या किनारपट्टीला ध़डकण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ ४ मे ला पहाटे किंवा ३ मे ला संध्याकाळी ते ओडिशाच्या किनाऱ्याला धडकू शकते. नेमकं कोणत्या ठिकाणी हे वादळ धडकेल याचा अंदाज लावता येत नसल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे.

ओडिशाच्या किनारपट्टीवर फनी धडकल्यास त्याचा वेग १७० ते १८० किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. यामुळे आजूबाजूच्या परिसराला नुकसान होऊ शकतं. किनारपट्टीला धडकल्यानंतर वादळाची तीव्रता कमी होऊ शकते. या वादळामुळे ओडिशा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळच्या किनारपट्टीसह काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.टॅग्स

संबंधित बातम्या