मार्च-एप्रिल महिन्यातील मॉन्सूनपूर्व पावसात २७ टक्क्यांनी घट
29 April 14:41

मार्च-एप्रिल महिन्यातील मॉन्सूनपूर्व पावसात २७ टक्क्यांनी घट


मार्च-एप्रिल महिन्यातील मॉन्सूनपूर्व पावसात २७ टक्क्यांनी घट

कृषिकिंग, नवी दिल्ली: देशातील काही भागांतील शेतीसाठी अतिशय महत्त्वाच्या अशा मान्सूनपूर्व पावसात घट झाली आहे. विशेषतः मार्च-एप्रिल या दोन महिन्यांमध्ये होणाऱ्या या पावसात यावर्षी २७ टक्क्यांनी घट झाली आहे. असे भारतीय हवामान विभागाकडून (आयएमडी) सांगण्यात आले आहे. देशाच्या अनेक भागांतील कडक उन्हाळा हे त्यामागील एक कारण आहे.

यावर्षी १ मार्च ते २४ एप्रिल या कालावधीत देशभरात पडलेल्या पावसाची मोजणी ४३.३ मिमी. इतकी आहे. हा पाऊस ५९.६ मिमी इतका असणे अपेक्षित आहे. ही घट सुमारे २७ टक्के आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा, जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यांचा मिळून जो परिसर आहे. तेथील ही घट ३८ टक्के इतकी आहे. दक्षिणेकडील पाचही राज्ये, पुद्दुचेरी, गोवा व महाराष्ट्राचा किनारी भाग येथील घट ३१ टक्के आहे, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली आहे.टॅग्स

संबंधित बातम्या