'फनी' चक्रीवादळामुळे दक्षिणेकडील राज्यांत 'हाय अलर्ट'; महाराष्ट्रातही पावसाची शक्यता
29 April 10:45

'फनी' चक्रीवादळामुळे दक्षिणेकडील राज्यांत 'हाय अलर्ट'; महाराष्ट्रातही पावसाची शक्यता


'फनी' चक्रीवादळामुळे दक्षिणेकडील राज्यांत 'हाय अलर्ट'; महाराष्ट्रातही पावसाची शक्यता

कृषिकिंग, चेन्नई: बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या दक्षिणेकडील समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्याची तीव्रता वाढत जाऊन येत्या १२ तासांत तामिळनाडूलगतच्या समुद्रात चक्रीवादळाचे संकेत आहेत. या चक्रीवादळाचे नाव 'फनी' असे आहे. ‘फनी’ या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने दक्षिणेकडील सर्वच राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

तामिळनाडूच्या उत्तरेकडील किनार्‍यासोबत आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनार्‍यावरही हे वादळ धडकू शकते. हे वादळ भीषण रुप धारण करण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. फनी चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातही पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते, असा अंदाजही हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय फनी चक्रीवादळामुळे २९ आणि ३० एप्रिल रोजी केरळमध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच ३० एप्रिल आणि १ मे रोजी उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्रच्या काही भागातही पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याकडून चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर तामिळनाडूत रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून, या भागातील मासेमारांना समुद्रात न जाण्याची सूचना देण्यात आली आहे. तसेच किनारपट्टीच्या भागातील नागरिकांनीही सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, २०१८ मध्ये ‘गाजा’ चक्रीवादळाने खूप नुकसान केले होते. या वादळाच्या तडाख्यात जवळपास ४० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता.



टॅग्स

संबंधित बातम्या